शिंदे गटाने मान्य केला हायकोर्टाचा निर्णय

in #yavatmal2 years ago

दसरा मेळाव्याच्या शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिवसेनेकडून मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. 2 ते 6 ऑक्टोंबरपर्यंत ठाकरे गटाला हायकोर्टाने परवानगी दिली आहे.कोर्टाने दिलेला निर्णय शिंदे गटाला मान्य असल्याचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितली आहे. आता शिंदे गटाला BKC मैदानावर दसरा मेळावा घ्यावा लागणार आहे. त्यांनी सांगितले की आम्हाला शिवाजी पार्कचे मैदान कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी पाहिजे होते. कारण तिथे जवळच हरबल लाईन, पश्चिम लाईन, मध्य लाईन आहे. आणि यांचे शिवाजी पार्क हे सेंटर आहे.शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगीसाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. असे म्हणत मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते.