नाशिक : पदविका अभ्यासक्रमांच्‍या अर्जाची उद्यापर्यंत मुदत

in #yavatmal2 years ago

नाशिक : इयत्ता बारावीनंतरच्‍या (HSC) पदविका (Diploma) अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. औषधनिर्माणशास्‍त्र (Pharmacology), सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी (Surface coating technology) तसेच हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी (Hotel Management and Catering Technology) या शिक्षणक्रमांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी शुक्रवार (ता.८) पर्यंत मुदत असेल. तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेशासाठीची प्रक्रिया राबविली जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता बारावीनंतरच्‍या पदविका अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे, तसेच आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शुक्रवार (ता.८) पर्यंत मुदत दिलेली आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना इ.-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. गुणवत्ता यादीची प्रक्रिया पूर्ण केल्‍यानंतर कॅप राउंडचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशासाठी चुरस बघायला मिळणार आहे.१५ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी

सध्याच्‍या वेळापत्रकानुसार प्रारूप गुणवत्ता यादी ११ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना हरकती, तक्रारी नोंदविण्यासाठी १२ ते १४ जुलै या कालावधीत मुदत उपलब्‍ध करून दिली जाईल. या प्रक्रियेनंतर १५ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.