औरंगाबाद : नशेच्या गोळ्यांची विक्री; आणखी तिघे जाळ्यात

in #yavatmal2 years ago

औरंगाबाद : नशेच्‍या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना सिडको पोलिसांनी रविवारी पहाटे बेड्या ठोकल्या. त्‍यांच्‍याकडून २३२० रुपये किमतीच्या ३९० नशेच्‍या गोळ्या हस्‍तगत केल्या आहेत. दुसऱ्या घटनेत नशेच्‍या औषधींची विक्री‍साठी आलेल्या एकाला एनडीपीएस सेल आणि क्रांतीचौक पोलिसांनी संयुक्तपणे शनिवारी रात्री बाबा पेट्रोल पंप चौकात अटक केली. त्याच्या ताब्यातून सुमारे १९ हजार १७२ रुपयांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला. वाळूज परिसरात शुक्रवारी रात्री मोठी कारवाई केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई करून दोन घटनेत पोलिसांनी तिघांना अटक करून नशेच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. ही कामगिरी निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अवचार, उपनिरीक्षक कैलास अन्नलदास, हवालदार सुभाष शेवाळे, प्रदीप दंडवते, किरण काळे, विशाल सोनवणे आणि औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनी केली. अधिक तपास निरीक्षक विनोद सलगरकर करीत आहेत.पहिली कारवाईशेख असिफ शेख जिलानी (वय ३७, रा. रेंगटीपुरा) आणि इब्राहिम शहा अकबर शहा (वय ४३, रा. बापुनगर, बोर्डी विस्‍तार, अडाजन सुरत गुजरात) यांना शनिवारी (ता. १८) रात्री ११.०५ वाजेच्‍या सुमारास जाधववाडी मोंढा येथे अटक केली. सिडकोचे पोलिस निरिक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी ही कारवाई केली. आरोपी शेख आसिफ याच्‍या पॅन्‍टच्‍या खिशातून २३२० रुपये किमतीच्या ३९० गोळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला आहे. या दोघांना दोघांना २३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. व्‍ही. चरडे यांनी दिले. न्यायालयात सहायक सरकारी वकील नीता किर्तीकर यांनी न्‍यायालयाकडे केली.दुसरी कारवाईशेख सोहेल शेख हारून (बागवान) (१९, रा.व्‍हीआयपी हॉल समोर, गल्ली क्रं.१० इंदिरानगर, न्‍यू बायजीपुरा) याला बाबा पेट्रोलपंप चौकात १८ जून रोजी रात्री एनडीपीएस सेल आणि क्रांतीचौक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली. आरोपीकडून तीन हजार रुपये किमतीच्या २५ नशेच्‍या औषधीच्‍या बाटल्या, ११७२ रुपये किमतीच्या १९७ गोळ्या, १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सुमारे १९ हजार १७२ रुपयांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला आहे. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. त्‍याला २१ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. व्‍ही. चरडे यांनी दिले आहेत.00crime_201_29.jpg