सोलापूर : पंढरपुरात चार तरुणांना रेल्वेने उडवले; तिघांचा जागीच मृत्यू

in #yavatmal2 years ago

Pandharpur Train Accident : पंढरपूरमध्ये रेल्वेने दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर एक जणम गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेत जखमी आणि मृत्युमुखी पडलेले तरूण मुळचे बिहारचे असून ते मजुरी काम करत असल्याचे सांगितले जात आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात चार मजूर रुळावरुन जात होते त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱया एखाद्या रेल्वेने या सर्वांना उडवले असल्याचे संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. अद्यपपर्यंत घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळक पटलेली नसून त्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहेदरम्यान, रुळाजवळ दारुच्या बाटल्यादेखील सापडल्या आहेत. त्यामुळे हे मजूर दारू प्यायलेले असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु आहे.

Sort:  

belalkhan10 (46) · 15 seconds ago
Good news visit my profile to