पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी बडतर्फ झालेले ST महामंडळाचे कर्मचारी आजपासू

in #yavatmal2 years ago

Ankita_Khane__7_.png
ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी बडतर्फ झालेले ST महामंडळाचे कर्मचारी आजपासून पुन्हा सेवेत
Published on : 13 October 2022, 3:07 am

By
टीम ईसकाळ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला केल्याप्रकरणी एसटी महामंडळाकडून 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रूजू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यानंतर या सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर आनंद साजरा केला आहे. ढोल ताशांच्या गजरामद्धे गुलाल उधळत एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारचेही आभार मानले आहेत.
या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांनंतर पुन्हा कामावर घेतलं जाणार असून त्याच्या पूर्वीच्याच जागी आणि पदावर कामावर त्यांना रुजू करुन घेतलं जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच सरकारकडून मोठी भेट मिळाली असल्याचा आनंद या कर्मचाऱ्यानी व्यक्त केला आहे. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मागील सरकारवर त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर आज (गुरुवार) पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: Nagpur : शरद पवार पुन्हा नागपूरला येणार

एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात दिले होते. एसटी महामंडळ यांच्यासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

Sort:  

wortheum Like, comment and follow the news of all the friends connected in me and go ahead