POK News: पाकव्याप्त काश्मीर आता भारतात येणार? भारतीय लष्कराकडून गुप्त हालचाली

in #yavatmal2 years ago

text_story__95_.jpgनवी दिल्लीः मागील कित्येक वर्षांपासून पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न खितपत पडला आहे. परंतु आज लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक सूचक विधान केलं आहे. त्यामुळे हा भाग परत मिळविण्यासाठी हालचाली सुरु आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज एक विधान केलंय. पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असं द्विवेदी म्हणाले आहेत. भारताकडून अशा हालचालींना वेग आलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने याबाबचे वृत्त दिले आहे.हेही वाचाः गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या उत्तरेकडचा भाग आहे. गिलगिट बाल्टिस्तानचा हा भाग पाकिस्तानच्या अखत्यारित आहे. पीओकेसाठी मागील कित्येक वर्षांपासून भारताचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु इथे आता लष्करी कारवाई होण्याचे संकेत दिसून येत आहेत.