PM मोदींच्या आईबाबत आपच्या नेत्याकडून आक्षेपार्ह वक्तव्य; भाजपची टीकेची झोड

in #yavatmal2 years ago

Ankita_Khane__9_.jpgदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आणि आप या पक्षांमध्ये आता चांगलीच जुंपली आहे. आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रमुख गोपाल इटालिया यांनी केलेल्या व्यक्तव्याचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये गोपाल इटालिया यांनी नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी वादग्रस्त टिप्पणी केल्याचं ऐकायला येत आहे. भाजप नेते अमित मालविय यांनी गोपाल इटालिया यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

आठवड्याभरीतील गोपाल इटालिया यांचा हा तिसरा वादग्रस्त व्हिडीओ असल्याचं यामध्ये सांगितलं आहे. या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने इटालिया यांना समन्स पाठवला आहे. तर दिल्ली पोलिसांनी बुधवारी इटालिया यांना यासंदर्भात काही वेळासाठी ताब्यातही घेतलं होतं.

हेही वाचा: ...तेंव्हा केंद्रीय संस्था कान धरून तुम्हाला बाहेर काढतील; मोदी सरकारवर ममता भडकल्या

या व्हिडीओवरून भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी या मुद्यावरून थेट अरविंद केजरीवाल यांना काही प्रश्न विचारत थेट निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल तुमच्या आशीर्वादामुळं अभद्र भाषा बोलणाऱ्या गोपाल इटालिया यांनी हिराबा यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. मी काही नाराजी व्यक्त करणार नाही. गुजराती किती नाराज आहेत हेदेखील मी दाखवू इच्छित नाही. पण, एवढं लक्षात ठेवा तुमचा पक्ष निवडणुकीत समाप्त होईल. आता जनताच न्याय करेल असंही त्यांनी म्हंटलं आहे