LIVE Update: कर्नाटक सरकारच्या 'हिजाब बंदी' प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज निकाल

in #yavatmal2 years ago

Ankita_Khane__4_.jpg पावसाच्या अपडेट्स या सर्व घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर.
04:57 AM, Oct 13 2022
सिंहगड एक्स्प्रेसमध्ये जागेसाठी पासधारक आणि सामान्य प्रवासी यांच्यात हाणामारी
सिंहगड एक्स्प्रेसमध्ये पासधारक आणि सामान्य प्रवासी असा हा वाद सुरू झाला. मुंबई-पुणेदरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेसमध्ये काल (बुधवारी) सकाळी चिंचवड स्टेशनवर येताच रेल्वेच्या बोगीत प्रवासी घुसले अन् जागा पकडण्यासाठी झुंबड उडाली. पासधारक प्रवासी आणि सामान्य प्रवासी यांच्यामध्ये जागा पकडण्यावरुन वाद सुरु झाला. हा वाद पुढे इतका वाढला की चक्क प्रवाशांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी सुरु झाली. अगदी काही प्रवासी डब्यात खाली पडेपर्यंत ही हाणामारी झाली. डब्यात उपस्थित इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला.

04:57 AM, Oct 13 2022
कर्नाटक सरकारच्या 'हिजाब बंदी' प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज निकाल
कर्नाटकमधील हिजाब बंदी प्रकरणांवर आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. हिजाब बंदी रद्द करण्याची याचिका कर्नाटक हायकोर्टाने फेटाळली होती. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टातील न्या. हेमंत गुप्ता या आठवड्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे हिजाब बंदीबाबतचा निर्णय आजच सुनावण्यात येणार आहे.

Sort:  

वर्थेम से जुड़े सभी दोस्तों की खबर को लाइक, कमेंट और फॉलो करें और आगे बढ़ें