BhagatSingh Koshyari : वादग्रस्त विधानानंतर कोश्यारींचा दिल्ली दौरा; पक्षश्रेष्ठींकडून होणार कानउघडणी?

in #yavatmal2 years ago (edited)

esakal_new___2022_11_22T180801_410.jpg![esakal_new___2022_11_22T180801_410.jpg](Bhagat Singh Koshyari News : राज्याचे राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी कोश्यारींनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....
हेही वाचा: Bhagat Singh Koshyari : कोश्यारी आणि हुशारीची गळाभेट घालून द्यावी लागेल; राजू पाटील

या सर्व घडामोडींमध्ये राज्यपाल भगसिंह कोश्यारी येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. कोश्यारींचा दिल्ली दौरा वादग्रस्त विधानानंतर होत असल्याने राजकीय वर्तूळात अनेक चर्चांना उधाण आले असून, दिल्लीत बसलेले पक्षश्रेष्ठी कोश्यारींची कानउघडणी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: CM Eknath Shinde: कोश्यारी प्रकरणावरुन शिंदे गटाची नाराजी जाहीर; त्यांना कुठंही पाठवा...

दरम्यान, कोश्यारी यांचा हा दिल्ली दौरा नियोजित असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, गेल्या काही दिवसांच्या वादग्रस्त विधानांनंतर कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या दौऱ्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील जनतेत रोष असून अनेक स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.)