Andheri By-Election : लटके वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच...मनसे नेत्याचे ट्विट चर्चेत

in #yavatmal2 years ago

sakal_sports__3_.jpg
Thursday, October 13, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Andheri By-Election : लटके वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच...मनसे नेत्याचे ट्विट चर्चेत
Published on : 13 October 2022, 4:15 am

By
टीम ईसकाळ टीम

अंधेरी पूर्व मतदारसंघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. ही निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र, ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी दिलेला राजीनाम्याचा अर्ज अजूनही मुंबई महापालिका प्रशासनानं स्वीकारला नाही. यामुळे उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान यासर्व वादात मनसे नेत्याने खळबळजनक ट्विट केले आहे. (Andheri ByElection Anil Parab Rutuja Latke BMC Mumbai Uddhav Thackeray MNS maharashtra politics )

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली असून यावर आज 11 वाजता सुनावणी होणार आहे. मात्र, यापूर्वीच मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

ऋतुजा लटके यांची जागा विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्यासाठीच अनिल परब यांचा हा सगळा डाव असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे. हा सगळा डाव एकनाथ शिंदे गटाचा असल्याचं अनिल परब म्हणत होते. मात्र, मनोज चव्हाण यांनी आता यात ठाकरे गटाचाच हात असल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा: Eknath Shinde: राजकीय करिअर धोक्यात आलं अन्...CM शिंदेंनी बोलून दाखवली ती मनातील खंत

नेमकं काय म्हटले आहे ट्विटमध्ये? मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकऊन अंधेरी ची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकच.....असं सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे.

Sort:  

wortheum Like, comment and follow the news of all the friends connected in me and go ahead