दहीहंडीला मिळणार खेळाचा दर्जा! 'प्रो कबड्डी'च्या धर्तीवर 'प्रो गोविंदा' होणार सुरु

in #yavatamal2 years ago

मुंबई : दहीहंडी या धार्मिक उत्सवाला आता खेळाचा दर्जा मिळणार आहे. राज्य सरकारनं याबाबत महत्वाचा निर्णय घेतला असून उद्या याबाबत विधानसभेत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता 'प्रो कबड्डी'च्या धर्तीवर 'प्रो दहीहंडी' हा खेळ सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांकडून गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीच्या मंडळांकडून दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, शिंदे-फडणवीस यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याबाबत उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी दहिहंडीला खेळाचा दर्जा द्यावा तसेच दहिहंडीदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.ऐतिहासिक निर्णयामुळं वर्षातून एकच दिवस होणाऱ्या दहीहंडीच आता वर्षातील ३६५ दिवस आयोजन करता येणार आहे. तसेच दहीहंडीमध्ये मानवी मनोरा रचणारे गोविंदा आता खेळाडू म्हणून ओळखले जातील. उद्या विधानसभेत याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, दहिहंडीतील गोविंदा पथकांना १० लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. याद्वारे हिंदू सणांना सुरक्षितता देण्याचं काम सरकारकडून होत असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.images_1533277785939_dahi_handi1.jpg

Sort:  

Like करे