आता सामना सुरु असतानाही बदलता येणार Playing 11; क्रिकेटमधील नव्या नियमाने मिळणार मद

in #yavatamal2 years ago

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) T20 क्रिकेटला अधिक आकर्षक, गतिमान आणि मनोरंजक बनवण्यासाठी 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम लागू करणार आहे. या नियमाच्या मदतीने, फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉलसारख्या खेळांप्रमाणेच टीम मधल्या सामन्यात खेळाडू बदलू शकणार आहे. बीसीसीआयने हा नियम सर्वप्रथम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतलाय. ही चाचणी यशस्वी झाली तर येत्या काळात आयपीएलमध्येही त्याचा वापर होताना दिसणार आहे