पंकजा मुंडे समर्थकांचा पुन्हा राडा, भागवत कराडांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न

in #yavatamal2 years ago

औरंगाबाद : पंकजा मुंडे समर्थकांनी आज पुन्हा राडा केला. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर पंकजा मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. विधान परिषदेत डावलल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक अजूनही नाराज आहेत.

पंकजा मुंडे समर्थकाकडून भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.