नीति आयोगाच्या बैठकीनंतर CM शिंदेंचं विधान; राज्याला किती निधी मिळणार?

in #yavatamal2 years ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्य़क्षतेखाली दिल्लीत नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीबाबत चर्चा झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (CM Eknath Shinde)नीती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परतले. त्यांनी या बैठकीत काय झालं, याबद्दल माध्यमांना माहिती दिली. महाराष्ट्राला केंद्राकडून भरघोस निधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.याच बैठकीतल्या एका फोटोमुळे ही बैठक चर्चेत आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व मुख्यमंत्री फोटोसाठी उभे होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना अगदी कोपऱ्यात मागच्या ओळीत उभं केल्यानं विविध नेत्यांकडून टीकाटिप्पण्या केल्या जात होत्या.

Sort:  

Please follow me and like my News 🙏💐