Rupee Bank : पुण्यातील रुपी सहकारी बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द!

in #yavatamal2 years ago

पुण्यातील रुपी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द करण्यात आला आहे. कर्जदारांकडून कर्जे थकवण्यात आल्यानं ही बँक अडचणीत आली होती. बँक अडचणीत आल्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. तसेच या बँकेच्या विलिनिकरणाचे प्रयत्नही सुरु होते. मात्र, विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच लायसन्स रद्द झाल्याने ठेवीदारांना मोठा धक्का बसला आहे. (license of Rupee CoOperative Bank in Pune has been canceled by the Reserve Bank)

हेही वाचा: पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; हेक्टरी १३,६०० रुपये मदत जाहीर

सन २०१७ च्या हायकोर्टाच्या आदेशानुसार रिझर्व्ह बँकेनं रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं आता सहा आठवड्यांत बॅंकेचे व्यवहार होणार बंद आहेत. बँकेत अनेकांचे पैसे अडकल्याने ठेवीदारांनी दिर्घ काळासाठी लढा दिला होता. पण बँकेच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच लायसन्स रद्द झाल्याने त्यांना धक्का बसला आहे.

Sort:  

Please like nd follow me