Rain Live Updates: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशामध्ये मान्सून अलर्ट

in #yavatamal2 years ago

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मंगळवारीही अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे. संततधार पावसामुळे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशामध्ये अलर्ट, भोपाळमध्ये शाळांना सुट्टी
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आजूबाजूच्या राज्यांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बंगालमध्ये मान्सून सक्रिय आहे. ओडिशातील नबरंगपूर, नौपाडा, बोलंगीर आणि बरघ या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.पावसामुळे नंदुरबार, भंडारा,गोंदिया, वर्धा, पुणे ठिकाणची सर्व धरणे भरली. सर्व धरणातून विसर्ग सुरू, तर नदी धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरु
महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या परिसरात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाच्या संततधारेमुळे उजनी आणि वीर धरण ओव्हरफ्लो झाले त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत 50 हजार तर वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पंढरपूर शहरासह नदीच्या शेजारील गावांना पुराचा धोका वाढला आहेराज्याच्या विविध भागात चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या सर्व ठिकाणी पावसामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.गोंदिया शहरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठून राहील आहे. बांध, तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल आहे. गोंदिया-बालाघाट मार्ग आणि गोंदिया-नागपूर मार्गावर नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गोंदिया जिल्यात मागील 36 तासा पासून सुरु असेलल्या मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं गोंदिया शहर जलमय झालं आहे.उत्तराखंडसह डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
उत्तरेकडील प्रदेशांबद्दल बोलायचे झाले तर, उत्तराखंड आणि इतर डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे, दिल्ली एनसीआर आणि यूपीच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस चालू आहे.

Sort:  

Please follow me and like my news