Mumbai News : आरेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

in #yavatamal2 years ago

घाटकोपर : आरे मेट्रो कारशेडविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक झाली आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोरेगाव येथे सुरू असलेल्या आरे मेट्रो कारशेडविरोधात जोरदार आंदोलन करत शिंदे व फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शिंदे-फडणवीस सरकारने आरे मेट्रो कारशेड पुन्हा आरे कॉलनीतच बांधण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरुद्ध गणेशनगर, गोरेगाव पूर्व येथे आंदोलन केले.

या वेळी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान सरकारविरोधात हातात फलक घेऊन ‘आरे वाचवा, प्रदूषण थांबवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी आंदोलनात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, अजित रावराणे, धनंजय पिसाळ, इंद्रपाल सिंग, आर्षद आमिर आदी उपस्थित होते.मालाड : मालवणी आणि काचपाडा येथील राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांनी व बॉम्बे कॅथलिक सभा यांच्या वतीने रविवारी (२८ ऑगस्ट) सकाळी ‘आरे बचाव’ आंदोलनात भाग घेतला. राष्ट्र सेवा दल व बॉम्बे कॅथलिक सभेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात हजेरी लावली.