Karnataka : किनारपट्टी भागाला अतिवृष्टीचा इशारा; शाळा-कॉलेज बंद

in #yavatamal2 years ago

कर्नाटक : नैऋत्य मान्सून (Monsoon Season) देशभरात सक्रिय झालाय. विशेषत: देशाच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनचे ढग मुसळधार पाऊस पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात (Karnataka) मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, आज (गुरुवार) राज्याच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. आयएमडीनं (IMD) दिलेल्या इशाऱ्यानंतर, सुरक्षेच्या दृष्टीनं आज शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. इथं भूस्खलनाच्या घटनेत तिघांचा मृत्यूही झालाय.मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील मंगळुरु (Mangalore) जिल्ह्यात दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झालाय. बुधवारी रात्री 8.45 च्या सुमारास ही घटना घडलीय. हेनरी कार्लो या व्यक्तीच्या शेतामध्ये केरळातील पाच मजूर काम करत होते. यादरम्यान दरड कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर तिघंजण चिखलात अडकले. अग्निशमन दलानं इतर तिघांना वाचवण्यात यश मिळविलं. मात्र, आज सकाळी यातील दोघांचा मृत्यू झालाय. पलक्कडमधील 45 वर्षीय बिजू, कोट्टायम येथील 46 वर्षीय बाबू आणि अलाफुझा येथील 46 वर्षीय संतोष अशी मृत मजुरांची नावं आहेत. दरम्यान, कन्नूर येथील 44 वर्षीय जॉनीवर उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील मंगळुरु (Mangalore) जिल्ह्यात दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झालाय. बुधवारी रात्री 8.45 च्या सुमारास ही घटना घडलीय. हेनरी कार्लो या व्यक्तीच्या शेतामध्ये केरळातील पाच मजूर काम करत होते. यादरम्यान दरड कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर तिघंजण चिखलात अडकले. अग्निशमन दलानं इतर तिघांना वाचवण्यात यश मिळविलं. मात्र, आज सकाळी यातील दोघांचा मृत्यू झालाय. पलक्कडमधील 45 वर्षीय बिजू, कोट्टायम येथील 46 वर्षीय बाबू आणि अलाफुझा येथील 46 वर्षीय संतोष अशी मृत मजुरांची नावं आहेत. दरम्यान, कन्नूर येथील 44 वर्षीय जॉनीवर उपचार सुरू आहेत.

Sort:  

paburam
हम सब लोग एक दूसरे की खबरों को लाइक करेंगे कमेंट करेंगे तभी आगे बढ़ेंगे खबरों को लाइक करें कमेंट करें