जबाबदारी आणि पालकत्वाची उत्तम सांगड! IAS Officerने दिल्या महत्वाच्या Parenting Tips

in #yavatamal2 years ago

संस्थेने सोपवलेली ऑफिसची जबाबदारी आणि घरच्यांनी सोपवलेली घरची जबाबदारी या दोन्ही जबाबदाऱ्यांची सांगड घालत पालक त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी पार पाडत असतात. खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. अशा वेळी अनेकदा पालकांना मुलांना वेळ कसा द्यावा हा प्रश्न पडतो. यावर दिव्या मित्तल या IAS Officerने पालकांना काही उत्तम टीप्स दिल्या आहेत. घर आणि ऑफिस सांभाळत दोन मुलींची जबाबदारी त्या उत्तमरित्या कशी पार पाडतात याविषयी त्यांनी टीप्स शेअर केल्या आहेत. (Parenting Tips by IAS Officer)

IAS Officer दिव्या मित्तल यांनी त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील पालक होण्याचा अनुभव शेअर करत या काही टीप्स दिल्या आहेत.

दिव्या मित्तल यांनी सांगितलेल्या Parenting Tips:

१. कठीण काही नसतं. तुम्ही काहीही करू शकता. असं ठासून तुमच्या मुलांना सांगा. हे तेव्हापर्यंत मुलांना सांगा जेव्हापर्यंत त्यांचा विश्वास बसत नाही. एकदा विश्वास बसला की ते त्यांच्या डेस्टिनेशनवर नक्की पोहोचणार.

२. खेळताना पडेल या भीतीने मुलांना रोकू नका. त्यांना पडू द्या. पडून परत एकदा ते उठतील. यातून त्यांना पडल्यानंतर परत एकदा आत्मविश्वासाने परत एकदा उठण्याची सवय लागेल. त्यांचा आत्मविश्वास वाढेल.मुलांना स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहन द्या. प्रत्येकवेळी ते जिंकतीलच असं नाही. मात्र हरल्याने त्यांना हरून पुन्हा एकदा नव्याने उठण्याची उर्जा मिळेल. कारण हारल्यानंतरच यशाची दुसरी पायरी चढणे सोपे असते.

४. मुलांना रिस्क घेऊ द्या

मुलांना नियंत्रणात जरूर ठेवा पण त्यांना इच्छा असणाऱ्या गोष्टीही त्यांना करू द्या. कदाचित काही वेळी ते रिस्की देखील ठरू शकतं. रिस्की गोष्टी केल्यानंतरच तुमच्या मुलांना त्यांनी पत्करलेल्या धोक्याचा अंदाज येईल. आणि पुढल्या वेळी ते जबाबदारीने वागतील.५. तुमची मानसिकता त्यांच्यावर लादू नये

मुलांना त्यांचं शिक्षण असो वा आवड त्यांच्यावर तुम्हाला काय वाटते त्याबद्दलचे विचार मुलांवर लादू नका. त्यांच्या आवडी निवडीनुसार त्यांना पुढे जाऊ द्या.

६. मुलांचे आदर्श बना

मुलांना तुम्ही ज्या सवयी लावता त्या तुम्ही आत्मसात करणं गरजेचं ठरतं. तुमची मुलं जर का काहीचं चुकीचं वागत असतील तर त्यांना त्याच क्षणी रागवा. त्यामुळे त्यांना योग्य वागण्याची सवय लागेल.

७. मुलांवर विश्वास दाखवा

मुलांचा अपेक्षाभंग करू नका. त्यांना पालकांकडून फार आशा असतात. तुम्ही जर का त्यांचा अपेक्षाभंग केला तर दुसऱ्यावेळी मुले तुमच्याकडून अपेक्षाच ठेवणार नाही.

८. मुलांना अनुभव घेऊ द्या

मुलांच्या मानसिक विकासाच्या दृष्टीने अनुभव फार महत्वाचा ठरतो. त्यांना बाहेर फिरायला न्या,त्यांच्याशी बोला आणि त्यांना काय वाटतं ते विचारा. त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टींचे ज्ञान मिळते.तुमच्या मुलांना मुर्खात काढू नका. त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकू नका. तुमच्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो.

१०. सगळ्यात महत्वाचं मुलांना प्रेम द्या

तुम्हा मुलांवर रागावले तरी नंतर त्यांना प्रेमाने जवळ घ्या. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे असे वेळोवेळी तुमच्या वागण्यातून जाणवू द्या नाहीतर मुले तुमच्यापासून दूर जातील.