महाराष्ट्राला २०० मेगावॅट वीज मिळणार, Davos Summit मध्ये मोठा करार!

in #yavatamal2 years ago

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) वार्षिक बैठकीत महाराष्ट्र सरकारने ३०,००० कोटींहून अधिक किमतीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे, माहिती तंत्रज्ञान, डेटा केंद्रे, कापड, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग, कागद आणि लगदा आणि स्टील या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी तब्बल 23 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या गुंतवणुकीमुळे राज्यात ६६,००० नोकऱ्या निर्माण होतील, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.

यासोबतच राज्यातील वाढती विजेची मागणी आणि भारनियमनाचे संकट पाहता ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक खेचून आणण्यात महाराष्ट्र यशस्वी झाल्याचं प्राथमिक चित्र आहे.

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याने विजेची तूट भरून काढता येणार आहे. रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेडने गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे. हा करार पूर्ण झाल्यास राज्याला रोज २०० मेगावाट वीज मिळणार आहे.

वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्याची मोठी उपलब्धी मानली जातेय. तसेच विजेच्या प्रकल्पांमुळे ३० हजार लोकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. महावितरण आणि रिन्यू पॉवर लिमिटेड कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.rasut.jpg

Sort:  

जब wortheum news में लाइक करने पर ही एक दूसरे का फायदा तब हमने आपको लाइक ओर फॉलो किया है प्लीज़ आप भी हमे लाइक ओर फॉलो करें।🙏

✍️