CWG 2022: पी व्ही सिंधूने रचला इतिहास; भारताची 19 व्या सुवर्णपदकाला गवसणी

in #yavatamal2 years ago

PV Sindhun Commonwealth Games 2022 : बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूने इतिहास रचला आहे. भारताने 19 व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. बॅडमिंटनमधील महिला एकेरीचा अंतिम सामन्यात भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेल लीशी झाला. पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल लीचा 21-15, 21-13 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलेसिंधूने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. पीव्ही सिंधूने पहिला गेम 21-15 अशा फरकाने जिंकत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. दुखापतीनंतरही सिंधू चांगली कामगिरी करत होती. दुसऱ्या गेममध्ये पीव्ही सिंधूनं मिशेल लीला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही आणि त्याने 21-13 कॅनडाच्या मिशेल लीशी पराभव केला. यासह भारताने न्यूझीलंडला मागे टाकत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

Sort:  

Please follow me and like my News 🙏💐

Please follow me and like my post sir🙏🙏🙏🙏