बळिराजावर दुबार पेरणीचे संकट?

in #yavatamal2 years ago

चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) परिसरात पावसाळ्याच्या सुरवातीला दोन दमदार पावसाच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी मका व कपाशीच्या पेरण्या आटोपत्या केल्या. मात्र, नंतर पावसाने आठवडाभराची उघडीप दिल्याने शेतकरी ठिबक सिंचन तसेच स्प्रिंकलरच्या मदतीने पिके जगवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र परिसरात आहे.गेल्या आठवड्यात हवामान विभागाने शनिवारी (ता. १८) पासून सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले. मात्र, पाऊस तर आलाच नाही. परंतु कडक ऊन, व दमट वातावरणामुळे पीक परिस्थिती बिकट झाली. इंधनाची दरवाढ झाल्याने यांत्रिकी मशागतीला अधिक खर्च, शिवाय खते व बियाण्यांचे वाढत्या भावामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सावकारी पैशांची साथ करून तर काहींनी कसाबसा पैसा उपलब्ध करून पेरणीसाठी कंबर कसली होती.मात्र, पावसाच्या लहरीपणापुढे शेतकऱ्यांनी आपले गुढघे टेकल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. दिवसभर ढग दाटून येतात तर काही काळ कडक ऊन पडते दुसरीकडे सोसाट्याचा वारा सुरुच असल्याने जमिनीतील ओलावा संपून त्या कडक पडल्या आहे. या कडक जमिनीवरील पापडीतून कशीबशी कपाशीचे झाडे कोंब काढून वर येण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे.मात्र, पावसाच्या लहरीपणापुढे शेतकऱ्यांनी आपले गुढघे टेकल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. दिवसभर ढग दाटून येतात तर काही काळ कडक ऊन पडते दुसरीकडे सोसाट्याचा वारा सुरुच असल्याने जमिनीतील ओलावा संपून त्या कडक पडल्या आहे. या कडक जमिनीवरील पापडीतून कशीबशी कपाशीचे झाडे कोंब काढून वर येण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे.esakal_new__7_.jpg