Gulam Nabi Azad: काँग्रेसच्या अडचणीत भर; ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम

in #yavatamal2 years ago

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षातल्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. (Gulam Nabi Azad Resigns from Congress)

हेही वाचा: गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार घोषणेमुळे काँग्रेसमध्ये वाद!

गेल्या काही दिवसांपासून गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) अस्वस्थ होते. ही अस्वस्थता पक्षाच्या बैठकीतून, त्यांच्या विधानांवरुन आणि कृतीतूनही दिसून येत होती. ते कधीही मोठा निर्णय़ घेतील, अशी चर्चा सुरू होतीच. या आधीच १६ ऑगस्ट रोजी त्यांनी जम्मू काश्मीरच्या प्रचार प्रमुख पदाचा राजीनामाही दिला होता. नियुक्तीच्या अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी हा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची नाराजी उघडकीस आली होती.या पूर्वी त्यांनी वारंवार काँग्रेसच्या कार्यपद्धतीबद्दल आपला आक्षेप नोंदवला होता. सोनिया गांधींना त्यांनी याबद्दल पत्रही लिहिलं होतं. जी-२३ नेत्यांचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं. शिवाय या गटावर काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेमुळेही ते अस्वस्थ होते. आनंद शर्मा यांनीही दोन दिवसांपूर्वी आपल्यावरच्या जबाबदाऱ्यांचा त्याग केला होता.