भारताच्या महिला संघाचा आजपासून पुण्यात सराव

in #yavatamal2 years ago

नवी दिल्ली : भारताच्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघाचे उद्यापासून (२९ ऑगस्ट) पुण्यात सराव शिबिर रंगणार आहे. हे शिबिर २ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशनच्या (सॅफ) वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या फुटबॉल स्पर्धेसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले. नेपाळ येथे ६ ते १९ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा नेपाळ येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा महिला संघ ३ सप्टेंबरला येथून नेपाळ येथे रवाना होणार आहे. भारतीय संघ गतविजेता असून ‘अ’ गटामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. भारताची सलामीची लढत ७ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. त्यानंतर १० सप्टेंबरला मालदिव व १३ सप्टेंबरला बांगलादेश यांच्याशी भारताला सामना करावा लागणार आहे.

सराव शिबिरासाठी निवडण्यात आलेले भारतीय महिला संघातील खेळाडू ः गोलकीपर - अदिती चौहान, मायबाम देवी, श्रेया हुडा, स्वॉमीया नारायणसामी. बचावपटू- स्वीटी देवी, रितू रानी, आशालता देवी, रंजना चानू, मनीषा पन्ना, अरिफा सय्यद, मायकेल कास्टन्हा, ज्युली किशन, संतोष. मधली फळी - अंजू तमंग, कार्तिका अंगमुथू, प्रियांका देवी, मार्टिना थोकचोम, संधीया रंगनाथन, काविया पाकिरीसामी, काश्‍मिना, रतनबाला देवी. आक्रमक फळी- दुलार मरंदी, अपूर्णा नर्झरी, सौम्या गुगूलोथ, रेणू, किरण पिसडा. प्रमुख प्रशिक्षक - सुरेन छेत्री.

भारताच्या लढती खालीलप्रमाणे

७ सप्टेंबर - पाकिस्तान

१० सप्टेंबर - मालदिव

१३ सप्टेंबर - बांगलादेश

सॅफ स्पर्धेची गटवारी

अ - भारत, बांगलादेश, मालदिव, पाकिस्तान

ब - नेपाळ, भुतान, श्रीलंका