नाकातून रक्त आल्यामुळं सोनिया गांधींना ऍडमिट? काँग्रेसकडून स्पष्टीकरण

in #yavatamal2 years ago

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (congress president sonia gandhi) यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडली आहे. त्यांना कोरोना झाला होता. दरम्यान, कॉंग्रेसने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. सोनिया गांधी याच्या नाकातून रक्त वाहू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.कॉंग्रेस नेता जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गानंतर 12 जूनला सोनिया गांधी यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.सोनिया गांधी यांना काल श्वास घेण्यास त्रास होत होता. नंतर त्यांच्या खालच्या श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे आढळून आले. अशी माहिती जयराम यांनी दिली. तसेच, कोरोनानंतर त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आणखी काही समस्या उद्भवल्या आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. असही जयराम यांनी सांगितलं.soana_mo.jpg