आमदारांनी साथ सोडताच ठाकरेंनी फिरवला फडणवीसांना फोन? सेनेने स्पष्टच सांगितलं

in #yavatamal2 years ago

महाराष्ट्रातील सत्तानाट्यात दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत. २० जूनला विधानपरिषदेचा निकाल लागल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या. सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसला. पक्षाच्या जवळपास ४० आमदारांनी शिंदेंचा हात पकडत थेट सूरत आणि तिकडून गुवाहाटी गाठलं. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आमदार नॉट रिचेबल लागत असल्याने सगळ्यांचीच धाकधूक वाढली. अखेर महत्वाचे सर्व नेते ठिकठिकाणाहून सूरतला रवाना होत असल्याचं स्पष्ट झालं, आणि सेनेतील फूट चव्हाट्यावर आली. (Uddhav Thackeray Calls Devendra Fadnavis)

बंडखोर आमदार अद्याप त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. दुसरीकडे भाजपच्या गोटात सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. फडणवीस पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, ठाकरे यांनी आमदार गेल्यानंतर फडणवीसांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. आता सेनेकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (Eknath Shinde in Guwahati)एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांशी संपर्क होत नसल्याने उद्धव ठाकरे यांच्या टीमने सर्वांसोबत संपर्क केला. यानंतर सर्व नॉट रिचेबल लागल्याने ठाण्याहून गुजरातच्या दिशेला गेल्याची माहिती काहींनी दिली. हे आमदार बंड करणार असल्याची चाहूल लागली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांनी फोन केल्याचं वृत्त समोर आलं आहे. यातून काही मार्ग निघू शकतो का, यासंदर्भत दोघांमध्ये बोलणं झालं. यावेळी काही आमदार परत आले. संजय जाधव, दादा भुसे संध्याकाळी बैठकीला हजर होते. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली.राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं की यातून आपण बाहेर पडू शकतो. उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. मात्र, शरद पवार यांच्या सांगण्यावरून त्यांनी निर्णय थांबवला. मात्र, सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची महिती समोर आली. यावर सेनेच्या बाजूने स्पष्टीकरण देण्यात आलंय. संबंधित बाबीला दुजोरा देण्याचं टाळलं आहे. शिवसेनेने अधिकृतपणे या वृत्ताला नकार दिला आहे. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात, असं हर्षल प्रधान यांनी सांगितलं. ते शिवसेना जनसंप्रर्कप्रमुख आहेत.fadanvus.jpg

Sort:  

नमस्कार

हमने आप की खबरों को लाइक कर दिया

आपने हमें सेवा का मौका दिया

आपकी इच्छा हो तो हमारी खबरों को लाइक और फॉलो करें

क्योंकि लाइक से ही आपको कॉइन मिलेगा खबर को ज्यादा से ज्यादा लाइक करें