औरंगाबाद : पाण्यासाठी नागरिकांचा जलकुंभावर मोर्चा

in #yavatamal2 years ago

: हर्सूल तलावाचे पाणी दूषित असल्याने जायकवाडी धरणाचेच पाणी देण्यात यावे, अशी मागणी करत हर्सूल गाव, जटवाडा रोडवरील एकतानगर भागातील नागरिकांनी मंगळवारी (ता. २८) हर्सूल पाण्याच्या टाकीवर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेरावही घातला. हर्सूल तलावातून हर्सूल गाव, जटवाडा रोडवरील परिसर, एकता नगर, वानखेडे नगर, एन-१३, हडको कॉर्नर या वसाहतींना पाणी दिले जात आहे. त्यासाठी पाण्याचा उपसा वाढविण्यात आला आहे. असे असताना आता हे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी समोर येत आहेतपरंतु गेल्या काही दिवसांपासून नळाला हिरवे, पिवळे, दूषित येत असून, त्यात अळ्या सुद्धा निघत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळी हर्सूल कारागृहाशेजारील जलकुंभावर मोर्चा काढला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. माजी नगरसेवक रूपचंद वाघमारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.0Handa_March.jpg

Sort:  

नमस्कार

हमने आप की खबरों को लाइक कर दिया

आपने हमें सेवा का मौका दिया

आपकी इच्छा हो तो हमारी खबरों को लाइक और फॉलो करें

क्योंकि लाइक से ही आपको कॉइन मिलेगा खबर को ज्यादा से ज्यादा लाइक करें