पुतिन यांचे जवळचे सहकारी अलेक्झांडर डुगिन यांच्या मुलीची हत्या

in #yavatamal2 years ago

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे राजकीय विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अलेक्जेंडर डुगिन यांची मुलगी डारिया डूगिन हिची हत्या करण्यात आली आहे.माहितीच्या आधारे डारिया ती तिच्या गाडीत निघाली होती दरम्यान तिच्या गाडीला बॉम्बने उडवले. राष्ट्रपती पुतीन यांचे राईट हॅन्ड अलेक्झांडर डुगिन विरोधकांच्या निशाण्यावर आहे.

त्यांना उडवण्यासाठी हा स्फोट करण्यात आला होता. या कारमध्ये अलेक्झांडर बसणार होते पण अचानक काही कारणास्तव त्यांनी या गाडीत न बसण्याचा निर्णय घेतला आणि नंतर त्यांची मुलगी त्यात बसून निघून गेली. रशियन मिडिया माहिती नुसार हल्ला केल्या नंतर तिथे वातावरण घडुळ झालं,घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले.मॉस्कोच्या ओडिन्सोव्स्की जिल्ह्यात डारिया डुगिनच्या लँड क्रूझर कारला स्फोट झाला आहे. याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना कारमध्ये अलेक्झांडर डुगिन यांची मुलगी डारिया डुगिन दिसली.

Sort:  

Please like and follow