न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढळलाय ; अत्याचारपीडित बिल्कीस बानो यांची प्रतिक्रिया Published on : 19 August 202

in #wortheummarathi2 years ago

Friday, August 19, 2022
AMP

ताज्या
शहर

मनोरंजन

देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढळलाय ; अत्याचारपीडित बिल्कीस बानो यांची प्रतिक्रिया
Published on : 19 August 2022, 12:08 am

By
सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : ‘दोषींची तुरुंगातून झालेली सुटका पाहून न्यायव्यवस्थेवरील माझा विश्वास डळमळीत झाला असून मी सुन्न झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया अत्याचारपीडित बिल्कीस बानो यांनी आज व्यक्त केली.‘गुजरात सरकारने या चुकीची भरपाई करावी आणि कोणत्याही भीतीशिवाय शांततेत जगण्याचा अधिकार आपल्याला पुन्हा बहाल करण्यात यावा,’ असे त्यांनी म्हटले आहे. बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणी २००२ मध्ये अकराजणांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गुजरात सरकारने मुक्तता धोरणान्वये या सगळ्या दोषींची सोमवारी सुटका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाष्य करताना बिल्कीस बानो म्हणाल्या की, ‘‘ इतका मोठा, अन्यायकारक निर्णय घेण्यापूर्वी कोणीही आपल्या सुरक्षिततेबाबत विचारणा केली नाही. मागील वीस वर्षांपूर्वी झालेला आघात १५ ऑगस्ट २०२२ रोजी पुन्हा माझ्यावर झाला. ज्या अकराजणांनी माझे कुटुंब आणि आयुष्य उद्ध्वस्त केले, ज्यांनी माझी तीन वर्षांची मुलगी हिरावून घेतली ते आज मोकाट फिरत आहेत.’’zvzggs.jpg