Ramdev Baba | रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीसाबद्दल केलं अजब विधान

in #wortheum2 years ago

रामदेव बाबाचं वक्तव्य काय?

अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्ष ते म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हणाले.

रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य

महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वादग्रस्त विधान रामदेव बाब यांनी काल केलं आहे. या वक्तव्यावरुन राज्यभरात चांगलच वातावरण पेटलं आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनीही त्यांच्यावर टिका केली. महिलांनी साडी, सलवार घालणे इथपर्यंत ठीक होतं पण पुढचं विधान कितपत योग्य याचा विचार करायला हवा. अमृता फडणवीसांनी तेव्हाच बाबा रामदेव यांच्या कानाखाली मारायला हवी होती, असं रूपाली पाटील म्हणाल्या.n4457066221669506078407a4cba5867b88d19afe1a7b0f8354f15ea0f5fc456921c135a0f1c9cb77ccee29.jpg