सूर्यकुमार बनू शकतो सर्वाधिक टी-20 धावा करणारा फलंदाज, पण करावी लागणार ख्रिस गेलासारखी खेळी

in #wortheum2 years ago

रविवारी भारताचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव याने नाबाद 111 धावा कुटल्या. या वादळी खेळीच्या जोरावर सूर्याने भारताला विजय मिळवून दिलाच, पण पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याच्या खास विक्रमाच्या अगदी जवळ देखील पोहोचला.

मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याचा हा विक्रम म्हणजे एका वर्षात सर्वात जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा. या यादीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्याने यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 1151 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे मोहम्मद रिझवान 1326 झावा करून यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी रिझवान याबाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिला होता. सूर्यकुमार यादव यावर्षी मोहम्मद रिझवानला पछाडण्यासाठी 175 धावांनी दूर आहे. पण अडचण 175 धावा नसून सामन्यांची आहे.

भारतीय संघाला मंगळवारी (22 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध तिसरा आणि वर्षातील शेवटचा टी-20 सामना खेळायचा आहे. अशात रिझवानचा हा विक्रम मोडण्यासाठी सूर्यकुमारला या सामन्यात 175 धावा कराव्या लागतील. टी-20 क्रिकेटमध्ये 175 धावा करणे कोणत्याही संघासाठी सोपी गोष्ट नाही, पण आयपीएल 2013 मध्ये ख्रिल गेल याने एकट्याने नाबाद 175 धावा कुटल्या होत्या. अशात सूर्यकुमारला जर रिझवानचा विक्रम मोडीत काढायचा असेल, तर त्याला देखील गेलसारखी 175 धावांची खेळी करावी लागेल.n4437964621668989696221f82a6d67035282bc77048dd52ca7eea07d9605124ba612889455475897ca454c.jpg