‘एम.ए’ व ‘एम.कॉम’चे प्रवेश सुरू; ३० ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज Published on : 30 September 2022, 11:30 am

in #wortheum2 years ago

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ (ओपन अँड डिस्टंन्स) अध्ययन प्रशालेअंतर्गत ‘एम.ए व एम.कॉम २०२२’ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.admission.jpg