यिन च्या वतीने वृक्षारोपण आणि संगोपनाची शपथ. Published on : 27 June 2022, 12:27 pm

in #wortheum2 years ago

काटेवाडी ता. बारामती : सकाळ माध्यम समूहाच्या यिन आणि श्री छत्रपती कला, वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने काटेवाडी येथील बिरोबा देवस्थान परिसरात यिनचे महाविद्यालयीन अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी वड, पिंपळ, चिंच अशा प्रकारच्या, पाच फूट उंचीच्या झाडांचे रोपण केले.वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे, पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे किती गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, यासाठी सर्व तरुणाईने पुढे येऊन पर्यावरण संरक्षण करणे महत्वाचे आहे.WhatsApp_Image_2022_06_27_at_12_15_34_PM__1_.jpeg