Chandni Chowk : चांदणी चौकातील पुलाच्या पाडकामामुळे वाहतुकीत बदल

in #wortheum2 years ago

पुणे : चांदणी चौकातील पुल पाडण्याचे काम रविवारी पहाटेच्या सुमारास होणार असल्याने शनिवारी रात्रीपासूनच वाहतुक बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेने केले आहे. शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. (Chandni Chowk bridge work Change in traffic rules) वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे :- सोलापूर रस्त्याने येऊन हडपसर मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांनी चौफुला, केडगाव, पारगाव नाव्हरे फाटा, नगर रोड, शिक्रापूर चाकण, तळेगाव मार्गे पुढे जावे. - चौफुला ते थेऊर फाटा दरम्यान येणारी जड वाहने हडपसर गाडीतळ मगरपट्टा चौक, उजवीकडे वळून मुंढवा चौक, खराडी बायपास, डावीकडे वळून नगर रोडने पुढे जुना पुणे मुंबई महामार्गाचा वापर करावा.Canva__27_.jpg