Bigg Boss Marathi 4: यंदा शेवंताची जादू! बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकरची एंट्री

in #wortheum2 years ago

Bigg Boss marathi season 4 : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा 'बिग बाॅस मराठी' या लोकप्रिय कार्यक्रमाचे चौथे पर्व लवकरच सुरु होणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर होणार आहे. या कार्यक्रमात कोणते स्पर्धक असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नुकतेच कलर्स मराठीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक स्पर्धक नृत्य करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धक नेमकी कोण आहे यावरुन बरीच चर्चा सुरू आहे. काहींनी आपापले अंदाजही वर्तवले आहेत. तर बघूया ही स्पर्धक कोण आहे. (actress apurva nemlekar in bigg boss marathi 4 grand premiere promo out)NILESH_ADSUL____2022_10_01T083604_025.jpg