JKCA : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांना ईडीचं समन्स!

in #vikram2 years ago

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांना समन्स पाठवलं आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (JKCA) कथीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. समन्सनुसार ३१ मे पर्यंत अब्दुल्ला यांना ईडीसमोर हजर रहावं लागणार आहे. यापूर्वीच्या समन्सवेळी ते हजर राहू शकले नव्हते म्हणून ईडीनं त्यांना पुन्हा समन्स बाजवलं आहे. (ED summons Farooq Abdullah in JKCA money laundering case)2farooq_20abdullah_0.jpg