Bigg Boss 16: 'तुला लाज वाटायला पाहिजे', बिग बॉसमधील राड्याला सुरुवात

in #vedant2 years ago

02_10_2022_archana_gautam_on_abdu_rozik_23113746.jpgBigg Boss: टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉसच्या 16 व्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. त्याच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या प्रोमोतून यंदाचा सीझन देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार असल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडीचा रियॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. आज मराठी बिग बॉसला देखील सुरुवात होणार आहे. हिंदीतील बिग बॉसचे होस्टिंग बॉलीवूडचा भाईजान सलमान खान तर मराठीतील बिग बॉसच्या होस्टिंगची जबाबदारी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे आहे.