Video: शिंदेजी...त्या रिक्षावाल्याला बेड्या ठोका; ठाण्यात महिला असुरक्षित?

in #tiwari2 years ago

ठाणे स्टेशन रोड परिसरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ठाणे स्टेशन रोड परिसरात शाळकरी मुलगी रिक्षातून उतरली. पण नंतर रिक्षाचालकानं तिचा हात पकडून तसंच तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेल असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. (girl molested rickshaw driver thane cctv Video )सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. त्या मुलीला फरफटत नेण्यामागे त्या रिक्षावाल्याचा नेमका काय हेतू होता? याचा पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. तर सोशल मीडियावरुन मुख्यमंत्री शिंदेजी त्या रिक्षावाल्याला बेड्या ठोका अशी मागणी करण्यात येत आहे.sakal_sports__2_.png