Shivsena : "आमचे चिन्ह-श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे!" नार्वेकरांचं सूचक ट्वीट

in #tiwari2 years ago

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वादात शिवसेना हे चिन्ह गोठवल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तर अंधेरी येथील पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यासाठी आज दोन्ही गटाला आपले चिन्ह आणि नाव आयोगाकडे द्यावे लागणार आहे. तर शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी आमचे चिन्ह श्री उद्धव ठाकरे असल्याचं सांगितलं आहे.(Milind Narvekar After EC Frozen Symbol Of Party)शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पण मिलिंद नार्वेकर यांचं ट्वीट सध्या चर्चेत आहे. नार्वेकर यांनी ट्वीट करत वाघाचा फोटो पोस्ट केला आहे आणि खाली आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे असं त्यांनी लिहिलं आहे. ते उद्धव ठाकरे यांचे चांगले मित्र आणि निकटवर्तीय समजले जातात.तर मध्यंतरी मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या काळात नार्वेकरांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी मोठा संशय निर्माण झाला होता. तर गुलाबराव पाटलांनीही नार्वेकर शिंदे गटात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या पण त्यांनी या चर्चेवर आता पाणी फिरले आहे.दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेवर आपला दावा केला होता. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर स्थगिती आणण्याची मागणी शिवसेनेने सुप्रीम कोर्टात केली होती. तर सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत ही स्थगिती उठवण्यात आली. त्यानंतर शनिवारी कोर्टाने निकाल देत शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गोठवलं आहे.Canva__57_.jpg