Shiv Sena symbol frozen by EC : उद्धव यांनी सहकाऱ्यांना पाठवले चिन्ह?

in #tiwari2 years ago

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आयोग गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनातील नव्या चिन्हाचे चित्र पक्षातील सहकाऱ्यांना पाठवल्याचे समजते. निवडणूक आयोगाचा आदेश येताच उद्धव ठाकरे यांनी काही सहकाऱ्यांना दूरध्वनी केले. या लढाईसाठी आपण तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले.ठाकरे गटाला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी तयार करणे हा या दूरध्वनीमागचा उद्देश असावा, असे एका नेत्याने नमूद केले. आजच्या आदेशानुसार शिवसेना हे नाव वापरता येणार नसले तरी शिवसेना ठाकरे गट हे नाव वापरण्यास मिळेल, अशी शक्यता दिसत आहे. त्याबाबत उद्याच्या बैठकीत विचार केला जाण्याची शक्यता आहे. वाघ, ढाल-तलवार किंवा गदा या चिन्हाचा शिवसेना ठाकरे गट विचार करत असला तरी शस्त्राची आता चिन्ह म्हणून निवड करता येत नाही, असे सांगितले जात आहे. दोन्ही गटांना चिन्हासाठी तीन पर्याय देता येणार आहे.अंधेरीची तयारीया निर्णयाचा प्रभाव अंधेरी पोटनिवडणुकीवर होणार आहे..शिंदे गट या निवडणुकीत उमेदवार उतरवणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे भाजप या निर्णयाचा विचार कसा करणार ते महत्त्वाचे आहे. रामभाऊ म्हाळगी उत्तन येथे सुरु असलेल्या भाजपच्या बैठकीत अंधेरी पोटनिवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. भागात कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून ती मते शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली तर ही निवडणूक ते जिंकू शकतील. भाजपसाठी ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक असल्याने जिंकण्याची रचना आखली जात आहे.3uddhav_aditya.jpg