Pro Kabaddi : मोठी दुर्घटना! पहिल्याच सामन्यात सर्वात महागडा खेळाडू स्ट्रेचरवरून बाहेर

in #tiwari2 years ago

Pawan Sehrawat Injured : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात तमिळ थलैवासची सुरुवात चांगली झाली नाही. थलायवास गुजरात जायंट्सविरुद्ध मोसमातील पहिला सामना खेळत असून पूर्वार्धातच त्यांना मोठा धक्का बसला आहे. लीगमधील सर्वात मोठा स्टार पवन सेहरावत दुखापतग्रस्त झाला आहे. बचाव करताना पवन जखमी झाला असून त्याला स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आले.हेही वाचा: VIDEO : 19 वं षटक कसं टाकायचं ते हारिस रौऊफकडून शिकावं!

थलायवाससाठी मॅटवर फक्त दोनच खेळाडू होते. यादरम्यान पवनने सहकारी बचावपटूला मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा पाय वळल्यामुळे तो जखमी झाला. पवनच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो वेदनेने ओरडत होता. फिजिओने तिथे येऊन त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. वेदनेने ओरडणाऱ्या पवनला पायही हलवता येत नव्हता. यानंतर त्याला मैदानाबाहेर काढावे लागले. तो चालण्याच्या स्थितीतही नव्हता आणि त्यामुळेच त्याला स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आले.sakal_sports__21_.png