Maharashtra Weather Update : राज्यात आज पावसाची शक्यता

in #tiwari2 years ago

पुणे : एकीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास ‘जैसे थे’च्या स्थितीत असून दुसरीकडे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. दरम्यान सोमवारी (ता. १०) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सध्या मॉन्सूनची परतीची सीमा उत्तरकाशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूचपर्यंत कायम आहे. अग्नेय अरबी समुद्रापासून ईशान्य राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून राजस्थान व लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.तर, सोमवारी (ता. १०) ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, नगर, जळगाव, नाशिक, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वाशीम, गोंदिया, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.शहर व परिसरात सध्या दिवसा उन्हाचे चटके तर दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे चित्र शहरात पाहायला मिळत असून पुढील दोन ते तीन दिवस अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला. शहरात ऊन-सावलीचा खेळ सुरू असून रविवारी शहरात ३१.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या बुधवारपर्यंत (ता. १२) शहर व परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तविली आहे.2Maharashtra_rains_website_2.jpg