Exam: मुंबई विद्यापीठातील पहिल्या सत्राच्या परीक्षेच्या सुधारित तारखा जाही

in #tiwari2 years ago

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा या दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर परीक्षा तयारीसाठी कमी वेळ मिळाला या कारणामुळे विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या आधी परीक्षा घेण्यासाठी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.मुंबई विद्यापीठाकडून 2022 चे पहिल्या सत्र म्हणजे, हिवाळी सत्र परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या असून या परीक्षा 4 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार आहेत. यातील 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीए आणि बीएस्सी सत्र 5 च्या परीक्षा या 4 नोव्हेंबर तर तिसऱ्या वर्षातील बीकॉम सत्र 5 ची परीक्षा 18 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होत आहेत. हिवाळी सत्राच्या सर्व शाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.Ankita_Khane___2022_10_13T081217_369.jpg