Diwali Festival 2022 : लक्ष्मी मूर्ती रंगरंगोटी कामात कलाकार दंग

in #tiwari2 years ago

नाशिक : दिवाळी आठ दिवसावर येऊन ठेपली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी लागणारी लक्ष्मीची मूर्तीला ग्राहकांची विशेष मागणी आहे. उन्हाळ्यात लक्ष्मीच्या मूर्ती तयार केल्‍या जातात, यानंतर त्‍यांचे रंगरंगोटीचे कामे साधारण दिवाळीच्या १ महिना अगोदरपासून सुरू होते. अलीकडच्या काळात ग्राहकांची लक्ष्मीपूजनासाठी मूर्तीला मागणी वाढली असल्‍याने मूर्ती कलाकारांचे काम त्‍या अनुषंगाने सुरू आहे. (Diwali Festival 2022 Lakshmi idol Making by Artist nashik Latest Marathi News)Friday, October 14, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Diwali Festival 2022 : लक्ष्मी मूर्ती रंगरंगोटी कामात कलाकार दंग
Published on : 14 October 2022, 1:30 am

By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवाळी आठ दिवसावर येऊन ठेपली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी लागणारी लक्ष्मीची मूर्तीला ग्राहकांची विशेष मागणी आहे. उन्हाळ्यात लक्ष्मीच्या मूर्ती तयार केल्‍या जातात, यानंतर त्‍यांचे रंगरंगोटीचे कामे साधारण दिवाळीच्या १ महिना अगोदरपासून सुरू होते. अलीकडच्या काळात ग्राहकांची लक्ष्मीपूजनासाठी मूर्तीला मागणी वाढली असल्‍याने मूर्ती कलाकारांचे काम त्‍या अनुषंगाने सुरू आहे. (Diwali Festival 2022 Lakshmi idol Making by Artist nashik Latest Marathi News)

पारंपारिक व्यवसाय असलेले मंडळी लक्ष्मी मूर्तीच्या रंगरंगोटीच्या कामात दंग आहेत. लक्ष्मीची एक मूर्ती रंग कामासाठी निदान १५ ते २० वेळेस हाताळावी लागते, कारण यात देवीच्या साडीचा रंग वाळल्‍यावर ब्‍लाऊजला रंग दिला जातो. मग दागिने याप्रमाणे रंगरंगोटीची काम केले जाते. अतिशय बारीक व किचकट काम आहे. तसेच रंगकाम करताना बैठक व एकाग्रता आवश्‍यक असते. सद्यःस्थितीत मूर्तीला रंग देण्याचे काम सुरू आहे. तसेच ३ इंचापासून ते दीड फुटापर्यंत मुर्ती बनविल्‍या जातात. ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्ती बनविल्‍या जात आहेत. तसेच साधारण ९ इंच व ११ इंच आकारातील मूर्तींना बाजारात जास्‍त मागणी आहे.मूर्तींचे दर आकारानुसार५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत आहेत.९ इंच ते ११ इंच मूर्ती ३०० रुपयांपासून ते ३५०, ४०० रुपयांपर्यंत आहेत.लक्ष्मीच्या मूर्ती या कमळावर बैठक स्‍वरूपात, तर धनाच्या राशीवर बैठक स्‍वरूपातील मूर्ती अतिशय आकर्षक आहेत.NSK22G30224.jpeg