Andheri Byelection : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ अर्ज दाखल

in #tiwari2 years ago

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी जागेसाठी आजपर्यंत तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. दोन अपक्ष आणि क्रांतिकारी जय हिंद सेनेच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंच आहे. मतदान ३ नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे.!या मतदारसंघातील शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, मुंबई महापालिकेच्या सेवेच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला होता. शेवटी तो न्यायालयात गेल्याने भाजप आणि शिंदे गटाने नव्या चाली रचल्या होत्या.ऋतुजा यांचा अर्ज न आल्यास या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी भाजप, शिंदे गट प्रयत्नशील होता. भाजपने उमेदवारी जाहीर केलेले पटेल हे आज अर्ज भरणार होते. त्यासाठी पक्ष आणि पटेल समर्थकांकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. न्यायालयाचा निकाल शिवसेना आणि लटके यांच्याविरोधात गेला असता; तर ही जागा शिंदे गटाला सोडण्याची तयारी भाजपची असल्याचे सांगण्यात येत आहे.मुरजी पटेलांचा अर्ज आजऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा गोंधळ वाढताच भाजपने सावध भूमिका घेतली आणि पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा मुहूर्त पुढे ढकलला. लटके यांच्या राजीनाम्याच्या वादावर उच्च न्यायालयाच्या निकाल दिल्यानंतर पटेल यांचा अर्ज शुक्रवाesakal_new.jpg