Panchang 13 August 2022: निळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

in #tivari2 years ago

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडेधर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १३ ॲागस्ट २०२२ (daily Panchang update 13 aug 2022)राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २२ शके १९४४आज सूर्योदय ०६:१८ वाजता तर सूर्यास्त १९:०० वाजता होणार. आज चंद्रोदय २०:२३ वाजता तर प्रात: संध्या स.०५:१० ते स.०६:१८ दरम्यान होणार. आज सायं संध्या १९:०० ते २०:०८ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:५६ ते १६:२८ दरम्यान तर प्रदोषकाळ १९:०० ते २१:१६ दरम्यान होणार. आज निशीथ काळ हा २४:१७ ते २५:०२ दरम्यान होणार तर राहु काळ ०९:२९ ते ११:०४ दरम्यान होणार. आज यमघंट काळ हा १४:१४ ते १५:४९ दरम्यान असणार तर आज श्राद्धतिथी हे द्वितीया श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०५ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी तोंडली खावू नये. या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.