पतीच्या आजारात जमापुंजी संपली, संसाराची `बॅटरी` गुल

in #tivari2 years ago

नागपूर : नियती एखाद्याची किती परीक्षा घेते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पोलिओग्रस्त मंजुषा पानबुडे. एकीकडे मंजुषाचे पती दुर्धर आजाराचा सामना करीत आहे, तर दुसरीकडे चरितार्थाचे एकमेव साधन असलेला ई-रिक्षा अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे त्या बेरोजगार होऊन घरी बसल्या आहेत. ई-रिक्षाच्या बॅटरीसाठी जागोजागी हातपाय मारत आहे. ३६ वर्षीय मंजुषा पती, दोन मुले व वृद्ध सासूसह अजनी परिसरातील चुनाभट्टी झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या एका छोट्याशा खोलीत राहातात