पुणे : किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर शंभरीकडे

in #tivari2 years ago

पुणे - बाजारात मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी होत. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे एक किलो दर ८० ते १०० रुपये पोहोचले आहेत. आवक सुरळीत न झाल्यास येत्या काही दिवसात टोमॅटोचे दर शंभरीपार होण्याची शक्यता किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.बाजारात टोमॅटोची आवक कमी होत असल्याने गेल्या पंधरा दिवसात टोमॅटोच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. सध्या किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोची विक्री प्रतवारीनुसार ८० ते १०० रुपये किलो दराने केली जात आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोचे दर आणखी वाढतील, अशी शक्यता किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी व्यक्त केली.टोमॅटो लागवडीत घट झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे. असल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर तेजीत आहेत. उन्हाळ्यामुळे टोमॅटोची लागवड कमी झाली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. केटरिंग व्यावसायिक तसेच हॉटेलचालकांकडून टोमॅटोला चांगली मागणी आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज चार ते पाच हजार पेटी टोमॅटोची आवक होत असून महिनाभरापूर्वी टोमॅटोच्या दररोज दहा ते बारा हजार पेटींची आवक व्हायची. एका पेटीत साधारणपणे वीस ते बावीस किलो टोमॅटो असतात असे व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले.टोमॅटो दरातील तेजीमागची कारणेवाहतूक तसेच लागवड खर्च न निघाल्याने शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने सध्या बाजारात टोमॅटोची अपेक्षेएवढी आवक होत नसल्याने टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी टोमॅटोने शंभरीपार केली होती. उत्पादन कमी झाल्याने दरात वाढ झाली होती. त्यानंतर टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. मात्र, टोमॅटोला अपेक्षित दर मिळाले नव्हते. टोमॅटोची आवक घाऊक बाजारात वाढल्याने एक किलो टोमॅटोला दर पाच ते दहा रुपये मिळाले होते. तेव्हा उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतात फेकून दिले होते.घाऊक बाजारातून खरेदी करताना किरकोळ बाजारातील खरेदीदार व्यापाऱ्यांना साधारणपणे एक किलोसाठी ५५ ते ६५ रुपये मोजावे लागत आहेत. वाहतूक खर्च तसेच अन्य खर्च विचारात घेतल्यास किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो टोमॅटोची विक्री ८० ते १०० रुपये दराने करावी लागत आहे. घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोची पेटी किंवा प्लास्टिक जाळीत खरेदी केल्यास त्यात तीन ते चार किलो टोमॅटो खराब निघतात. एका पेटीत वीस ते बावीस किलो टोमॅटो असतात. उन्हाळ्यामुळे टोमॅटोच्या प्रतवारीवर तसेच लागवडीवर परिणाम झाला आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर जास्त आहेत.- प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजारलग्नसराई, हॉटेल चालकांकडून मागणी वाढली आहे. आवक कमी होत असल्याने टोमॅटोचे दर तेजीत आहेत. टोमॅटोची लागवड पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर भागात मोठ्या प्रमाणावर केली जाते. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. उन्हाळ्यामुळे लागवडीवर परिणाम झाला असून गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे.- विलास भुजबळ, ज्येष्ठ व्यापारी, मार्केट यार्ड