हे घटनाबाह्य सरकार कोसळणारच! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

in #thane2 years ago

कांजुरमार्ग आणि विक्रोळीतील शिवसैनिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आमदार सुनील राऊत यांच्या प्रयत्नाने कांजुरमार्ग येथे 5 एकरवर उभारण्यात आलेल्या सर्व सुविधायुक्त बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे आणि विक्रोळी मतदारसंघातील टागोरनगरमधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. शिवसैनिकांबरोबर संवाद साधताना त्यांनी प्रत्येक शिवसैनिक हा निडर आहे, असे सांगत त्यांनी भाजपकडून पेंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असला तरी कोणताही शिवसैनिक घाबरणार नाही. संजय राऊत यांनी ते सिद्ध केले आहे. संजय राऊत यांना पेंद्रीय तपास यंत्रणांनी तुरुंगात टाकले, मात्र कोर्टाने संजय राऊत यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर ठरवली. पेंद्रीय तपास यंत्रणा शिवसैनिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आपला आवाज कोणी दाबू शकत नाही.

शिवसेनेला कोणी संपवू शकत नाही, हे तुम्ही एवढय़ा मोठय़ा संख्येने उपस्थित राहून मला दाखवून दिले आहे, अशा शब्दांत उपस्थित शिवसैनिकांचे आभार मानले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपनेते दत्ता दळवी, विभागप्रमुख-आमदार रमेश कोरगावकर, उपविभागप्रमुख अनंत पाताडे, चंद्रशेखर जाधव, विधानसभा संघटक परम यादव, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत, सुवर्णा करंजे,n44382011016689883100887a275e8711ef83a2ba13e2d36f7add4db727296ec055588663ab7db240f81560.jpg