मनसेनं रणशिंग फुंकलं; नागपुरात भाजपाविरूद्ध लढणार

in #thane2 years ago

Raj Thackeray Nagpur Press Conference : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी झाल्या होत्या. या सर्वामध्ये भाजप आणि मनसे युती होणार अशा चर्चांनादेखील उधाण आले होते. सध्या राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याची सुरूवात भाजपचा बालेकिल्ला नागपूरमधून झाली आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेच्या युतीबद्दल मोठं विधान केले आहे. मात्र, त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.